मुंबई : शाळेच्या पहिल्या दिवशी 1 कोटी एक लाख विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. 16 जानेवारी रोजी राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिलीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वेळेत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पाठ्यपुस्तकांसाठी केंद्र सरकारकडून राज्याच्या शिक्षण विभागाला ३१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर
झाला आहे. ३१ मे १०२५ पर्यत सर्व पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. याबाबत समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक संजय यादव आणि राज्य शिक्षण विभाग सचिव रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकास नुकतीच मान्यता मिळाली.
बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यात शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य
संस्थाच्या शाळांचेही विद्यार्थी असतात. बालभारती संचालकांच्या मागणीनुसार ५१ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केलेला आहे. छपाईचे ७० टक्के काम पर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत हे सर्व काम पूर्ण होईल. राज्यात ६४८२० सरकारी शाळा, २३५४९ सरकारी विनाअनुदानित शाळा आहेत ज्यामध्ये १ कोटी १ लाख विद्यार्थी संख्या आहेत.ज्यांना या अभियानअंतर्गत लाभ होणार आहे.
पहिलीची ७० टक्के पुस्तके वितरित
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा शैक्षणिक वर्षात पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे. एनसीईआरटीच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तके ७० टक्के वितरण पूर्ण झाल्याचे बालभारतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर ही पुस्तके शाळांपर्यंत आणि खुल्या बाजारातही उपलब्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. बालभारतीकडून पहिली ते दहावीपर्यतच्या मराठीसह हिंदी गुजराती, कन्नड आदी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्याना लागणारी सुमारे ६.५५ कोटी पुस्तके दरवर्षी छापली जातात. यात प्रत्येकवर्षी नवीन अभ्यासक्रम आणि नियमित पुस्तके अधिक असतात. यासोबत पाठयेतर प्रकाशनसोबत किशोरसारख्या मासिकांचीही छपाई केली जाते.
Leave a Reply