Category: Blog
-

जिथे नाही युद्धाची जाण; तिथे सेनेची दाणादाण
•
उद्धवसेनेच्या सहा खासदारांच्या पक्षांतर करण्याच्या बातम्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ उठले आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे, राज्यात आणि देशात, एक पक्षीय, म्हणजे, भाजप केंद्रित लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येणार का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, उद्धवसेनेच्या भविष्याचा. आधीच दुफळीमुळे दुर्बळ झालेल्या उद्धवसेनेच्या कार्यपद्धतीवर, सध्या समाज माध्यमातून भरभरून बोलले जात…
-

ड्रोन क्रांती – आधुनिक युद्धाचे, दहशतवादाचे बदलते स्वरूप आणि आपल्यासमोरील नव्या आव्हानांची चाहूल…
•
परवा, खास पत्रक प्रसिद्ध करून, केंद्र सरकारने, संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर , ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारके किंवा पायाभूत सुविधांवर ड्रोनद्वारे हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एक नवीन आणि गंभीर आव्हान समोर आले आहे. बंदरे, विमानतळे, ऊर्जा प्रकल्प, दळणवळण व्यवस्था, लष्करी तळ, नौदल सुविधा आणि इतर…
-

पुण्यातील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात, दिवंगत हरी नरके सर असते तर …?
•
पुणे हे भन्नाट शहर आहे आणि पुणेकर हा एकदम वेगळा ‘प्राणी’ आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबा राजे यांच्या हस्तस्पर्शाने सुजलाम -सुफलाम झालेल्या या शहराने, अटक ते कटकपर्यंतचे मराठा साम्राज्य पाहिले आहे , अनुभवले आहे . याच शहरांत महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी पहिला ‘ज्ञान दिवा’ पेटवला ,…
-

‘वडापाव सम्राट’ अशोक यांचा जागतिक सन्मान
•
मुंबईची ओळख बनलेला, आमचे मित्रवर्य अशोक ठाकूर यांचा , ‘अशोक वडा पाव’ नुकताच TasteAtlas च्या “जगातील सर्वात आयकॉनिक सँडविचेस” च्या यादीत २५व्या क्रमांकावर झळकला आहे. याआधी सुप्रसिद्ध टेस्ला कारच्या जाहिरातीत , मित्रवर्य अशोक आणि त्यांचा चवदार बटाटे वडा सहभागी झालेला पाहून , हा वडापाव आनंदाने खाणाऱ्या , तमाम मुंबईकरांचा उर…
-

नामदार नानांच्या वाढदिवसानिमित्त…
•
नामवंत वात्रटिकाकार रामदास फुटाणे , म्हणजे आमचे नाना यांचा आज वाढदिवस . वयाच्या ८३व्या वर्षातही , नाना सक्रिय आहेत . तरुणाच्या उमेदीने लिहिताहेत …त्यांनी कायम लिहीत राहावं आणि कविसंमेलने गाजवीत राहावं , तमाम महाराष्ट्राला हसवत आणि हसत शंभरी गाठावी या हार्दिक शुभेच्छा ! माझा नानांचा अनेक वर्षांपासून परिचय आहे .…
-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यस्मरण
•
जगाचा इतिहास चाळताना, विविध घटनांमध्ये अनेकदा धक्कादायक साधर्म्य आढळतात. आणि मन आश्चर्याने स्तिमित होते. अशीच परिस्थिती आहे, १४ एप्रिल या तारखे संदर्भातील…. जगाच्या दोन मोठ्या लोकशाही प्रधान राष्ट्रांमध्ये, लोकशाही अस्तित्वात येण्याआधी , सव्वीस वर्षांच्या अंतराने, १४ एप्रिल या तारखेला घडलेल्या या घटना, दोन महामानवांच्या जीवन प्रवासाशी निगडित आहेत. एकाचा १८६५…
-

नमो अरिहंताणं ! – महेश म्हात्रे
•
सर्व इंद्रिये जिंकून झाला जो युवराज स्थिर अहिंसेचा पुरस्कर्ता देई दुर्बलास धीर… मानवधर्म आचारोनी केले विश्व मंदिर नमितो मी चित्तविजयी भगवान महावीर ! इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील महान प्रज्ञावंत भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी भारतीय विचारविश्वाला ज्ञानमार्ग दाखवून आपल्यावर फार मोठे उपकार केले आहेत. प्रस्थापित पराक्रमी राजघराण्यात…
-

निसर्ग रक्षणाची गुढी उभारू या
•
गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना, एका वेगळ्या विषयावर बोलायचे आहे. हा विषय आहे मराठी अस्मितेचा, सामाजिक जाणिवेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा… हा विषय आहे राजा सातवाहनाचा, हा विषय आहे, निसर्ग, जल, जंगल, जमीन रक्षणाचा. गोदावरीच्या काठावर येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर , इतिहासाच्या पानात दडलेल्या एका विलक्षण पराक्रमी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा…
-

स्वामी गोविंद गिरी यांची बदलती भूमिका आणि संतांचे अढळ स्थान
•
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या राष्ट्रीय चर्चासत्रातील बीजभाषणात स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेतील ग्रंथस्वरूपाबाबत केलेली मांडणी मोठ्या वादाचे कारण ठरली आहे. त्यांच्या मते, दासबोध हा संतपरंपरेतील एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, “ज्ञानेश्वरी” आणि “एकनाथी भागवत” ही भाष्ये, तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या “गाथा”, या…
-

नितळ, पारदर्शी संपादक : प्रदीप वर्मा !
•
नव्वदच्या दशकातील राजकीय, सामाजिक घडामोडींनी भारलेला तो काळ विलक्षण वेगवान होता. धावपळीचा होता. दैनिक मुंबई सकाळमध्ये दणदणीत बातम्या देण्याची एकच चढाओढ सुरू असे. तेव्हाच, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश एम एल पेंडसे, ज्येष्ठ संपादक माधव गडकरी आणि सात नामवंत आमदार यांच्या विरोधात मी…
