मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अकरावी प्रवेशासाठी २६ मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. आधी या नोंदणीसाठी ३ जूनपर्यंत मुदत होती. ती नंतर ५ पर्यंत वाढवण्यात आली. आत्तापर्यंत तब्बल १२ लाख २० हजार ऑनलाइन अर्ज करण्यात आले आहे. आज ५ जून गुरुवार दुपारी २ वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील. अकरावीसाठी ४ जूनपर्यंत १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये मुंबई विभागात १ लाख १९ हजार ५९२ जणांची नोंदणी झाली आहे. मुंबईत १,१९,५९२ नोंदणी शिक्षण विभागाची सॉफ्टवेअर प्रणाली सुरळीत होत असली तर काही ठिकाणी अजूनही अडचणींची नोंद झाली आहे.
त्यात मुंबई विभागातील सीबीएसईच्या रिपिटर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान, आता १७ हजारपैकी फक्त ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती शिक्षण विभाग संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेचा ५ जूनला शेवटचा दिवस असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.रिपिटर म्हणून पास झालेल्या एसएससी आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना योग्य पर्याय उपलब्ध होत नाही आणि तसेच त्यांच्या मोबाईलवर ओटीपीही येत नाही, अशा तक्रारी आता केल्या जात आहेत. या तक्रारीच्या निवारणासाठी चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचाऱ्यांकडे प्रशासकीय अधिकार नसल्याने ती अडचण दूर झालेली नाही.


Leave a Reply