१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी, 36 चेंडूत शतक; ठरला पहिला भारतीय

आयपीएल 2025 मध्ये जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या 47व्या सामन्यात इतिहास घडला! अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धमाकेदार फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना वैभवने अवघ्या ३५ चेंडूत झंझावाती शतक ठोकत आयपीएलमधील अनेक विक्रम मोडीत काढले.या शतकासह वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने यूसुफ पठाणचा ३७ चेंडूत शतकाचा विक्रमही मागे टाकला. वैभवचं हे शतक केवळ वयाचं नाही, तर भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठीही नवं पर्व सुरू करणारं ठरलं आहे.

आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा नवा तेजस्वी तारा ठरलेला १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं आणि ऐतिहासिक शतक फटकावून संपूर्ण क्रिकेटविश्वाला थक्क केलं आहे.वैभवने राजस्थानच्या डावातील पाचव्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर फोर ठोकला. वैभवने या खेळीतील 48 धावा या फक्त 9 चेंडूत षटकार आणि चौकारांच्या मदतीने केल्या. त्याच्या या अर्धशतकात ६ षटकार आणि ३ चौकार होते आणि त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 300 होता.पण ही केवळ सुरुवात होती!अर्धशतक गाठल्यानंतर वैभवने आणखी आक्रमक फटकेबाजी करत अर्धशतक ते शतकाचा प्रवास अवघ्या १८ चेंडूत पूर्ण केला. वैभवने 285.71 च्या स्ट्राईक रेटने 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. हे वैभवच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं असून, त्याची ही खेळी आयपीएलच्या इतिहासात सर्वांत वेगवान आणि सर्वात युवा फलंदाजाचं शतक म्हणून सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल.

आयपीएल 2025 मध्ये केवळ १४ वर्षे आणि ३२ दिवसांचं वय असलेल्या वैभव सूर्यवंशीने जे करून दाखवलं, ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरलं आहे. त्याने वयाच्या बालपणीच अशा दर्जेदार खेळीने आयपीएलमध्ये शतक ठोकून नवा इतिहास रचला.वैभव आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगाने शतक करणारा दुसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी ही कामगिरी केवळ ख्रिस गेलने २०१३ साली केली होती, जेव्हा त्याने फक्त ३० चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर तब्बल अनेक वर्षांनी वैभवने ३५ चेंडूत शतक करत हे धाडस केलं.यासोबतच वैभवने ११ षटकार मारत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. तो आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्या या विक्रमी खेळीने संपूर्ण स्टेडियम थरारून गेलं.

राजस्थानसमोर २१० धावांचं मोठं लक्ष्य
दरम्यान, गुजरात टायटन्सने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. गुजरातकडून कर्णधार शुबमन गिलने ८४ धावा, तर जोस बटलरने ५० धावांची दमदार खेळी केली. तसेच साई सुदर्शनने ३९ धावांचं मोलाचं योगदान दिलं.या तिघांनी राजस्थानला 200 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *