जगभरातील ४० टक्के मुले मातृभाषेतून शिक्षणापासून वंचित

मुंबई : जगभरातील सुमारे ४० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, असा धक्कादायक निष्कर्ष युनेस्कोच्या शिक्षण विषयक अहवालातून समोर आला आहे. २५व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
जरी अनेक देशांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मान्य केले असले, तरीही त्याच्या अंमलबजावणीत कमतरता असल्याचे युनेस्कोच्या पथकाने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक साहित्याची अनुपलब्धता, प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता आणि समाजातील विरोध यांसारख्या अडचणींमुळे मुलांना मातृभाषेतून शिकण्याची संधी मिळत नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘लँग्वेज मॅटर : ग्लोबल गाईडन्स ऑन मल्टिलिंग्वल एज्युकेशन’ या अहवालानुसार, मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये तब्बल ९० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही.
भारत सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NPE) मधील मातृभाषेतून शिक्षणाच्या धोरणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे मानले जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *