मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातील ४१ पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त अनिल कुमार, वरिष्ठ सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, आणि पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याव्यतिरिक्त, सात पोलिसांना शौर्य पदक, तर ३४ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. शौर्य पदक विजेत्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक नेताजी धुळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर महाका, हेडकॉन्स्टेबल मनोहर पैगम, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कन्नाके, अतुल येगेलोपवार, आणि हिदायत खान यांचा समावेश आहे. तसेच, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश येडगे यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ७० जवानांचा गौरव
पाकिस्तानविरोधी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये असामान्य धैर्य दाखवणाऱ्या सशस्त्र दलातील ७० जवानांनाही शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये हवाई दलाच्या ३५ जवानांचा समावेश असून, अधिकाऱ्यांना ‘वीर चक्र’ जाहीर झाले आहे. सीम सुरक्षा दलाच्या १६ जवानांनाही शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यामध्ये एक डेप्युटी कमांडेंट, दोन असिस्टंट कमांडेंट आणि एक इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे.
कामकाजाचा ठसा उमटवणारे अधिकारी
मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त अनिल कुमार यांनी १९९३ पासून पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी भंडारा, गडचिरोली, नाशिक, नागपूर, मालेगावमध्ये सेवा दिल्यानंतर, २००६ ते २०१० दरम्यान पुणे शहरात उपायुक्त म्हणून काम केले. पुणे शहर पोलीस दलात महत्त्वपूर्ण मानले जाणारे पश्चिम-२ रवी ब्राह्मण यांनी ठाणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मान
उत्कृष्ट सेवेसाठी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त दत्ताराम बोधे, रोहेत धिवार, ज्योती देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आंधळे, रवींद्र वाणी, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, यशवंत मोरे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कोंडे यांना ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत. याशिवाय, राज्यातील ३७ अन्य पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उपमहानिरीक्षक मनोज पाडवे, सहायक दंडअधिकारी गजानन माने, कल्पना मुळेकर, नरेंद्र हिरे, सत्यवान माशळकर, आंचळ मुदगल, ओक्ट्रटिंग पटले, विश्वास पाटील, दीपककुमार वाघमारे, अनिल ब्राह्मणकर आणि जोसेफ डिसिल्वा यांचा समावेश आहे.
Leave a Reply