अर्थसंकल्पीय पर्वाची तयारी पूर्ण!
१ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठवा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यंदाचा अर्थसंकल्पही मागील वर्षांप्रमाणे पूर्णतः पेपरलेस स्वरूपात असेल.
अर्थसंकल्प म्हणजे काय?
अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या आगामी आर्थिक वर्षातील (१ एप्रिल ते ३१ मार्च) महसूल आणि खर्चाचा लेखाजोखा. सरकारच्या खर्च, उत्पन्न आणि आर्थिक धोरणांचा सारांश यात सादर केला जातो, ज्याला “वही-खातं” म्हणूनही ओळखलं जातं.
कधी सादर होणार अर्थसंकल्प?
अ) तारीख: १ फेब्रुवारी २०२५
ब) वेळ: सकाळी ११ वाजता
क) ठिकाण: लोकसभा, नवी दिल्ली
अर्थसंकल्प थेट कुठे पाहता येईल?
• दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या अधिकृत वाहिन्यांवर थेट प्रसारण
• सरकारच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट पाहण्याची सुविधा
• www.indiabudget.gov.in या अधिकृत पोर्टलवर अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांचा डिजिटल स्वरूपात अभ्यास
• केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप: अनुदान मागण्या, वित्त विधेयक, आणि अन्य दस्तऐवज हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध
• सरकारी पोर्टल: www.indiabudget.gov.in वर संपूर्ण दस्तऐवज वाचता येईल
अर्थसंकल्पाआधी होणाऱ्या हलवा समारंभाचे महत्त्व काय?
१९८० च्या दशकापासून भारतीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेतील परंपरा असलेला हलवा सोहळा केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीचा अंतिम टप्पा असतो.
अर्थसंकल्पाच्या तयारीचं महत्त्वाचं टप्पे
२०२५ च्या अर्थसंकल्पासाठी अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ पासून तयारी सुरू केली. विविध मंत्रालयांशी सखोल चर्चा करून याला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारनं अनेक पारंपारिक अर्थसंकल्पीय वैशिष्ट्ये काढून टाकली आहेत. यामध्ये २०१७ मधील मुख्य अर्थसंकल्पाशी रेल्वे अर्थसंकल्पाची सांगड घालणे, सादरीकरणाची तारीख महिन्याच्या अखेरीवरून १ फेब्रुवारी करणे आणि २०२१ मध्ये डिजिटल स्वरूपात स्विच करणे यांचा समावेश आहे.
Leave a Reply