कर्नाटक सरकार राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘कर्नाटक पर्यटन रोपवे विधेयक, २०२४’ सादर करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाद्वारे राज्यभरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रोपवे आणि केबल कार प्रकल्प उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.राज्याच्या पर्यटन सचिव सलमा के. फहीम यांनी सांगितले की, “कर्नाटक हे दक्षिण भारतातील पहिले राज्य ठरेल, जे रोपवे उभारणीसाठी स्वतंत्र विधेयक आणत आहे. यात रोपवेची उभारणी, व्यवस्थापन आणि देखभालीसंबंधी सर्व नियमांचा समावेश असेल.”
राज्य सरकारने नंदी हिल्स (बंगळुरू), अंजनाद्री टेकड्या (कोप्पल), मधुगिरी किल्ला (तुमकूर), मल्लल्ली धबधबा (कोडागु), सावदत्ती यल्लम्मना गुड्डा (बेलगावी), बेल्लारी किल्ला, यादगीर किल्ला, नृपतुंग हिल, देवरागुड्डा (हवेरी), होलाम्मा गदग मंदिर, कालकालेश्वर मंदिर (गदग) आणि मैलारलिंगेश्वर मंदिर (यादगीर) या ठिकाणी रोपवे आणि केबल कार प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “इतर अनेक राज्यांमध्ये आधीच रोपवे कायदा आहे, जो अशा प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी मदत करतो. कर्नाटकातील डोंगराळ प्रदेशांमुळे येथे रोपवेचा मोठा फायदा होऊ शकतो. शिवाय, हा एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक पर्याय ठरेल.

कर्नाटक पर्यटनाला नवा गतीमान प्रवाह; राज्यभर रोपवे आणि केबल कार प्रकल्पांचा विस्तार
•
Please follow and like us:
Leave a Reply