मुंबई येथे भरवण्यात आलेल्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष म. भा. चव्हाण, तर स्वागताध्यक्ष अशोक टाव्हरे होते. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी, मुंबई येथे आयोजित या साहित्य संमेलनात नामदेव ढसाळ यांच्या अद्वितीय साहित्याचा गौरव करण्यात आला.
८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी आपल्या ओघवत्या शैलीत नामदेव ढसाळांचे साहित्य आणि दलित पँथरच्या कार्याची सखोल मांडणी केली. गोलपिठापासून सुरू झालेला त्यांचा साहित्यप्रवास जागतिक स्तरावर अलौकिक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. संमेलनाध्यक्ष आणि प्रसिद्ध गझलकार म. भा. चव्हाण यांनी, अशोक टाव्हरे यांच्या परिश्रमातून साकारलेले हे संमेलन वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यास महत्त्वाचे योगदान देईल, असे मत व्यक्त केले.
स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून, यानिमित्ताने कवीसंमेलन आणि परिसंवादाच्या माध्यमातून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गौरव समारंभ आणि पुस्तक प्रकाशन
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या कार्यावर पीएच.डी करणारे साहित्यिक डॉ. विलास तायडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘कुलस्वामिनी’ स्मरणिका, अशोकराव टाव्हरे यांच्या ‘आठवणीतील कोरोना’ या कवितासंग्रहाचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावरील ‘विकासाचा राजमार्ग’ व ‘हायवे ऑफ डेव्हलपमेंट’ या पुस्तकांच्या पुढील आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कांताराम सोनवणे, ललिता सबनीस, प्रकाश शितोळे, अनंत धनसरे, विजय कानवडे, निशिगंधा साकोरे, संजना मगर, अक्षता गोसावी, तसेच उद्योजक राजेश मुलचंदानी, दशरथ पानमंद, नारायण मेघाजी लोखंडे यांचे वंशज गोपीनाथ लोखंडे, प्राचार्य सुनील टाव्हरे, चंद्रकांत सोनवणे, श्री अंबिका देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ साबळे, कन्हेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, दिलीपराव माशेरे, संतोष शेटे, अक्षय गायकवाड, कल्याणी पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाचे संयोजन राजु खंडीझोड यांनी केले, तर सुत्रसंचालन सतीश प्रघणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात सुरेखा टाव्हरे यांनी आभार प्रदर्शन केले.
Leave a Reply