चप्पल चोरीपासून वाचण्यासाठी हॉटेलचालकाची भन्नाट उपाय; ट्रिक सोशल मीडियावर चर्चेचा विषय

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलने चप्पल चोरी रोखण्यासाठी एक भन्नाट उपाय शोधला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या हॉटेलने पाहुण्यांसाठी अशा चपला ठेवण्यास सुरुवात केली आहे, ज्या दिसायला अनोख्या आहेत,पायात घालण्यासाठी आरामदायक, पण हॉटेलबाहेर नेण्यासाठी अजिबात आकर्षक नाहीत! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये हॉटेलच्या बाथरूमसमोर दोन वेगवेगळ्या रंगांच्या चपला ठेवलेल्या दिसतात एक जैतून हिरव्या रंगाची आणि दुसरी नारंगी-तपकिरी रंगाची.

‘तेजस्वी उदुपा’ नावाच्या एका एक्स Xयूजरने हा फोटो शेअर करत लिहिले, “हे मुंबईतील हॉटेल आपल्या पाहुण्यांसाठी चपला पुरवते, पण त्या कोणी चोरू नयेत म्हणून जाणीवपूर्वक जुळवणी नसलेल्या चपला देतात!

नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया!

ही कल्पना पाहून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी हॉटेलच्या हुशारीचं कौतुक केलं, तर काहींनी मिश्कील टिप्पणी केली “हे तर नवकल्पनांचे उत्कृष्ट उदाहरण आहे! आतिथ्य आणि उलट मानसशास्त्राचा भन्नाट संगम! एका यूजरची प्रतिक्रिया. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की अरे, मी तरी या चपला घरी घेऊन जाईन! त्या पूर्णपणे असमान नाहीतच की! घरच्या घरीही वापरता येतील.

भारतीय पाहुणे हुशार असतात, ते एकत्र येऊन योग्य जुळवणीच्या चपला शोधून घेतल्या असतील! तिसऱ्या यूजरची मिश्कील टिप्पणी. ही घटना दाखवते की हॉटेल्सना अनेकदा त्यांच्या मोफत सुविधा चोरीला जाण्याचा प्रश्न भेडसावतो आणि यावर नवनवीन कल्पक तोडगे काढण्याची गरज भासते. मात्र, हॉटेलची ही नवी युक्ती पाहुण्यांच्या सवयी बदलू शकते का, की लोक या अनोख्या चपला तरीही घरी घेऊन जातील? हे पाहणं मनोरंजक ठरेल

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *