शहरी लोकसंख्येत महाराष्ट्र अव्वल!; उत्तर प्रदेशलाही टाकले मागे

मुंबई : भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, तर उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. मात्र, ‘राष्ट्रीय लोकसंख्या आयोगा’च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्राने शहरी लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे महाराष्ट्र आता देशातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्राची झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २७ लाख ९८ हजार होती, तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २० कोटी ८ लाख ९७ हजार होती.

त्यावेळी उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य होते. मात्र, पुढील दशकातील लोकसंख्या वाढीचा अंदाज घेत ‘राष्ट्रीय लोकसंख्या आयोगा’ने २०३६ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या जाहीर केली आहे. या अहवालात प्रत्येक राज्यातील लोकसंख्या वाढीचा दर, शहराकडे होणारे स्थलांतर आणि शहरी-ग्रामीण लोकसंख्येचे संभाव्य प्रमाण यांचा आढावा घेण्यात आला आहे.

●शहरांची लोकसंख्या वाढण्याची कारणे
शिक्षण व रोजगारासाठी स्थलांतर उच्च शिक्षण घेणारे तरुण मोठ्या शहरांकडे वळत असून, त्यामुळे गावांमध्ये फक्त वृद्ध लोक उरले आहेत.

●गुन्हेगारी वस्तींची वाढ;
काही भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बस्तान मांडले आहे.

●मूलभूत सुविधांचा अभाव;
अनेक गावांमध्ये पाणी, वीज, आरोग्यसेवा यांसारख्या सोयींची कमतरता असल्याने शेतीवर अवलंबून असणारे नागरिकही मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर करत आहेत.

●शहरीकरणाचा वेगवान विस्तार;
शहरालगतच्या सुपीक जमिनींवर मोठ्या प्रमाणात लेआउट विकसित होत आहेत. धनिकांनी या जमिनी विकत घेतल्याने त्यांचाही समावेश शहरी लोकसंख्येत होत आहे.

प्रमुख राज्यांत वाढणारी शहरी लोकसंख्या

●२०११ मध्ये महाराष्ट्रात ५,११,१६,००० लोक होते, आणि २०३६ मध्ये याचा अंदाज ७,१४,६२,००० लोकांचा आहे.

●उत्तर प्रदेशात २०११ मध्ये ४,४८,३९,००० लोक होते, आणि २०३६ मध्ये ते वाढून ६,७३,२४,००० लोक होण्याचा अंदाज आहे.

●आंध्र प्रदेशात २०११ मध्ये १,४७,४०,००० लोक होते, आणि २०३६ मध्ये ते २,४३,९३,००० होण्याचा अंदाज आहे.

●मध्य प्रदेशात २०११ मध्ये २,०२,१२,००० लोक होते, आणि २०३६ मध्ये त्यात २,९८,४०,००० लोक होण्याचा अंदाज आहे.

●गुजरातमध्ये २०११ मध्ये २,५९,८७,००० लोक होते, आणि २०३६ मध्ये ते ४,४९,६४,००० होण्याचा अंदाज आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *