महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक ‘या’ तारखेला होणार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होणार असल्याची अधिकृत घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी केली. राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च रोजी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या जागांसाठी मतदान होणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील पाच सदस्य आमदार म्हणून निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या आणि त्यामुळे पोटनिवडणूक आवश्यक ठरली.

या पाच रिक्त जागांमध्ये भाजपचे तीन (प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राजेश विटेकर आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) अमश्या पाडवी यांचा समावेश आहे.

• अमश्या पाडवी यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे.

• राजेश विटेकर यांचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत आहे.

• प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे.

निवडणूक आयोग १० मार्च रोजी अधिकृत अधिसूचना जारी करेल.

• १७ मार्च – नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख
• २० मार्च – नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत
• २७ मार्च – सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत मतदान
• २७ मार्च संध्याकाळी ५ वाजता – मतमोजणी व निकाल जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण ७८ सदस्य असून, सध्या २६ जागा रिक्त आहेत.

सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या संख्याबळाचा आढावा घेतल्यास –

• भाजपकडे १९ एमएलसी
• राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रत्येकी ७ एमएलसी
• शिवसेना (शिंदे गट) ६ एमएलसी
• राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३ एमएलसी
• अपक्ष ३ एमएलसी

या पोटनिवडणुकीत एकूण २८८ आमदार मतदान करणार आहेत. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी (शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) विरुद्ध भाजप आणि शिंदे गट यांच्यात चुरस पाहायला मिळेल. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील संख्याबळ, रणनीती आणि युती यावर निकाल अवलंबून असेल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *