पुणे : चंदनात उमटवलेला छत्रपती शिवरायांचा उजव्या हाताचा ठसा (हस्तमुद्रा) पुणे येथे ७ मार्च ते ११ मार्च या दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दर्शनासाठी असणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे या हस्तमुद्रा दर्शनासाठी ठेवण्यात येतील. म्हसवडचे श्रीमंत राजे माने घराण्याच्या ऐतिहासिक दस्तावेजातील जतन करून ठेवण्यात आलेले या हस्तमुद्रा आहेत. हा ठसा नागोजी मानेच्या अभयपत्रवर महाराजांनी उमटवला होता.
पूर्वी चंदन तेलात मिसळुन असा ठसा उमटविला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ही हस्तमुद्रा साताऱ्याच्या संग्रहालयात आहे. गंध, चंदनाचा हा ठसा एका कागदावर उमटवलेला असून त्यामागचा इतिहासही रंजक आहे. शिवकाळात मोठ्या सरदारांना इनाम दिले जायचे, त्यावेळी इनामनाम्यावर असा हाताचा ठसा उमटवला जाई. आजच्या काळात अंगठ्याचा ठसा घेतला जातो, तशीच काहीशी ही प्रथा होती. असाच एक ठसा असलेला कागद म्हसवडच्या राजेमाने घराण्याकडे होता. तिथून तो या संग्रहालयाच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि उजव्या पायाचा चुनखडीत बुडालेला ठसा सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही आहे.
त्या व्यतिरिक्त महाराजांची त्यांच्या हयातीत आणि महानिर्वाणानंतरची अनेक मंदिरेही आहेत. मोडी लिपीत त्यांची स्वाक्षरी अनेक पत्रांवर आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात म्हसवडच्या राजमाने घराण्यातील सदस्यांनी त्यांच्याकडील छत्रपती शिवाजी महाराजांचा चंदनाच्या लेपात बुडवलेल्या हाताचा ठसा असल्याचा एक कागद दिला आहे. आता तो सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यावतीने दर्शनासाठी पुण्यात दर्शनासाठी ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवप्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिवप्रेमींनी महाराजांच्या हस्तमुद्रांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply