बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी ठामपणे लावून धरली होती. आता अंजली दमानियांनी बीड प्रकरणाचा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, बीड प्रकरणाचा तपास तुकाराम मुंढेंकडे देण्यात यावा. मराठवाड्यात त्यांच्या नियुक्तीची गरज आहे.
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला. त्यांनी सांगितले की, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे पूर्वीपासून गुन्हेगारीत एकत्र होते. २००७ मधील बीड प्रकरणातील एफआयआरमध्ये त्यांची नावे एकत्र आहेत. मात्र, नंतर धनंजय मुंडेंचे नाव या प्रकरणातून वगळले गेले.
मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी या भागांत वाढलेल्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंसारख्या निर्भीड अधिकाऱ्याची गरज असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले. बीडमध्ये ‘मुंडे विरुद्ध मुंढे’अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. या भागाला असा अधिकारी हवा, जो कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. राज्य सरकारने तुकाराम मुंढेंना बीडमध्ये नियुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.
बीड प्रकरणात केवळ वाल्मीक कराडच नव्हे, तर धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे व त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, एलसीबीचे गित्ते यांना देखील सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी दमानियांनी केली.
बालाजी तांदळे यांना अटक करुन हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवा, वाल्मीक कराड याच्यापर्यंत येऊ देऊ नका याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते, असा दावा दमानिया यांनी केला होता केला
Leave a Reply