‘कोकाटेंना शिक्षा दिली तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, जनतेचा पैसा खर्च होईल’; न्यायालयाचे निरीक्षण

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांच्यावर आमदारकीची सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार होती. मात्र आता न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आपत्रतेची होणारी कारवाई टळली आहे. मात्र स्थगिती देताना न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले त्याची चर्चा सध्या मोठ्याप्रमाणात होत आहे.

काय आहे निरीक्षण?

या संदर्भात न्यायालयाने म्हटले की, गेल्या 35 वर्षापासून कोकाटे हे लोकप्रतिनिधी आहेत. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. जर त्यांना अपात्र ठरवले तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल. आणि त्यात जनतेचे पैसे खर्च होतील, असे निरीक्षक जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने यांनी नोंदवले असल्याची माहिती एका वृत्तपत्रे दिली आहे. ‘कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. संपूर्ण खटल्या दरम्यान कोकाटे ही जामीनवर बाहेर होते. खटला पूर्ण झाल्यानंतरही त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र जर त्यांना अपात्र ठरवले तर हा त्यांच्यावर अन्याय होईल, असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक स्थित न्यायालयाने 1995 च्या एका प्रकरणात 2 वर्षाची कैद व 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. यामुळे लोकप्रतिनिथित्व कायद्यातील तरतुदींनुसार ते विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरण्याची भीती होती त्यामुळे त्यांनी या शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. कोर्टाने अपिलावरील सुनावणी सुरू असेपर्यत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी कोर्टाने वरील निरीक्षण नोंदवले आहे.

कोकाटे यांच्या राजीनाम्याची होत होती मागणी

मागील काही दिवसांपासून मंत्री कोकाटे यांना शिक्षा सूनवल्यानंतर विरोधक आक्रमक झाले होते. कोकाटे यांची आमदारकी रद्द करत त्यांना मंत्री पदावरून पायउतार करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अर्थसंकल्प अधिवेशनात देखील कोकाटे यांच्या शिक्षेचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता. पहिल्या दिवशीपासून धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. मुंडे यांनी राजीनामा दिला आता कोकाटे यांचं काय, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता न्यायालयानेचं त्यांचे शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *