संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी 3 वर्षीय चिमुकलीला लिहली भावनिक पोस्ट

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिक्षकाने संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे. धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचे नाव असून त्यांनी बीड येथील संस्थांचालकाच्याचं कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसी आउटडोरच्या ग्रीलला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने एक भावनिक फेसबुक पोस्ट लिहली होती. ज्यामध्ये त्यांनी शाळेच्या संस्थाचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे नावेही नमूद केले आहेत.

धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. ते बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणाने त्यांनी संस्थाचालक विक्रम मुंडे याला वेतनाबद्दल विचारलं असता ‘तू फाशी घे म्हणजे तू ही मोकळा होशील आणि मी ही तुझ्या जागेवर कर्मचारी घ्यायला मोकळा’, असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यादिवशीपासून या लोकांनी मला अधिक त्रास द्यायला सुरुवात केली, असं शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये नागरगोजे यांनी लिहलं आहे. या पोस्टमध्ये विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे , अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे यांना आपल्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे.

आपल्या 3 वर्षाच्या चिमुकलीची मागितली माफी

धनंजय नागरगोजे यांनी आपल्या 3 वर्षीय श्रावणीला उद्देशून पोस्ट लिहली. त्यामधील एका बापाने चिमुकलीसाठी लिहलेले शेवटचे शब्द वाचून डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. त्यात असं लिहलंय की, “श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिले होते पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रूपयेला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच तर एक कर एकदा तुझ्या बापूला माफ कर. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे. तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.”

 

मृत शिक्षक धनंजय नागरगोजे यांची मृत्यूपूर्वी लिहलेली फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

“श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही
बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
विक्रम बाबुराव मुंडे
विजय विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
आणि
त्यांचे कार्यकरते
उमेश रमेश मुंडे
गोविंद नवनाथ आव्हाड
ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे
या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे .मला हे
हाल हाल करून मरणार आहेत मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही
श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला.
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत.कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे.
सर्वांना माझा शेवटचा राम राम”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *