महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या एकूण जीवन व्यवहाराचा अभ्यास करण्याच्या हेतूने “महाराष्ट्र रिसर्च सेंटर” या संस्थेची स्थापना झाली आहे.
महाराष्ट्र देशी सध्या खुप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवनाला प्रचंड वेग आला आहे. या वेगाने, आवेगाने समाजात घुसळण सुरू आहे . त्यामुळे सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलत्या स्थितीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन या संशोधन केंद्राची स्थापना केली आहे.
“संवाद, सर्वेक्षण, संशोधन” या त्रिमिती मधून महाराष्ट्राकडे पाहताना नवे ज्ञान संपादन करणे आणि समाजाला जागृत करणे, हे संस्थेचे मुख्य ध्येय असेल. दि. ७ सप्टेंबर, २०२४ रोजी,
गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्र रिसर्च सेंटरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासाची अचूक मांडणी करणारी विचारवंत प्रा डॉ सदानंद मोरे यांची संपादक महेश म्हात्रे यांनी घेतलेली महा-मुलाखत हे सेंटरच्या संवाद मालिकेतील प्रथम पुष्प आहे.
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारी, अवघ्या महाराष्ट्राला स्फुरण चढवणारी ही महा-मुलाखत आपल्यासमोर सादर करताना आनंद होत आहे.
महेश म्हात्रे
संपादक – संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Please follow and like us:


Leave a Reply