मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे वादग्रस्त विधाने टाळण्याबाबत तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. झटका, हलाल मटण असेल किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल यावरून राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांना ही तंबी दिली गेल्याचं बोललं जातं आहे. सध्या औरंगजेबच्या कबरीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मंत्री नितेश राणे यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी खुलताबाद येथे असलेली औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची मागणी केली होती.
त्यानंतर सोमवारी नागपूर येथे या प्रकरणावरून तुफान राडा झाला. विरोधकांनी या प्रकरणाला नितेश राणे यांच्याशी वक्तव्याशी जोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याच मुद्दयावरून् मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना त्यांच्या
कार्यालयात बोलावून तंबी दिली असल्याची माहिती सुत्रानी दिली, “वादग्रस्त विधानं टाळा” अशा सुचना फडणवीसांनी राणेंना दिल्या आहेत.
काय म्हणाले नितेश राणे?
दरम्यान, नागपूर येथील हिंसाचारातनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीतेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याची दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पत्रकारांनी याविषयी राणे यांना छेडले असता त्यांनी माझा
समावेश फडणवीसांच्या लाडक्या मंत्यांमध्ये होत असल्याचा दावा केला. माझा समावेश मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये होतो. माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? त्यांची चिंता कुणी करायची नाही. माझ्या तोंडी कुणी लागू नये,असे ते म्हणाले.
“पाकिस्तानच्या अब्बांची आठवण होईल ” : नितेश राणे
नागपूर दगंलीतील आरोपींवर पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे नागपूरमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता. समाजकंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला केला त्यामुळे सरकार शांत
कसे राहील? या प्रकरणी आरोपींना त्यांच्या पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल अशी कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
Leave a Reply