शिवसेना (ठाकरे गट) यांच्या मुखपत्र सामना मध्ये वापरण्यात आलेल्या ‘हिंदू तालिबान’ या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शेखर त्र्यंबक जोशी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलीस ठाण्यात सामनाचे संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
हिंदू समाजाचा अपमान;तक्रारदारांचा आरोप
अॅड. जोशी यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, सामनाच्या संपादकीयमध्ये ‘हिंदू तालिबान’ हा शब्द वापरण्यात आला असून, त्यामुळे हिंदू समाजाचा अपमान झाला आहे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
वादाचे मूळ कारण काय?
महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सामनाच्या संपादकीयमध्ये हिंदुत्वाच्या एका विचारसरणीवर टीका करताना ‘हिंदू तालिबान’ हा शब्दप्रयोग करण्यात आला. मात्र, हिंदू संघटनांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत ”हा हिंदू धर्माचा सरळसरळ अपमान आह” असा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Leave a Reply