कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना ४% आरक्षण देण्याच्या निर्णयावरून वाद सुरू असताना,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे.ते म्हणाले, “आपले संविधान धर्मावर आधारित आरक्षणाला परवानगी देत नाही. जो कोणी हे करत असेल, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या विरोधात जात आहे.”होसबळे यांनी असेही स्पष्ट केले की, पूर्वी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मुस्लिमांसाठी धर्माधारित आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयांनी तो फेटाळून लावला. त्यामुळे कर्नाटक सरकारने हा निर्णय पुन्हा एकदा नीट विचारपूर्वक घ्यावा, असे सूचित केले.
औरंगजेबचा गौरव करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे”
महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या कबरीवरील वादावरही होसबळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जे लोक गंगा-यमुनेचा आदर करतात, त्याच लोकांनी औरंगजेबाला आयकॉन बनवले! हे योग्य नाही. त्यांनी पुढे सांगितले की, औरंगजेबाचं महत्त्व वाढवणाऱ्या लोकांची मानसिकता भारतासाठी धोकादायक आहे. बाहेरून आलेल्या आक्रमकांना आदर्श मानायचे की आपल्या मातृभूमीतील महान व्यक्तींना सन्मान द्यायचा, हा खरा प्रश्न आहे.त्यांनी वक्फबाबतच्या चर्चांवरही भाष्य करत; समाजहिताच्या दृष्टीने या चर्चा गरजेच्या आहेत असे सांगितले.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना आमचा ठाम विरोध”
RSS बैठकीत बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात एक ठराव मंजूर करण्यात आला. होसबळे म्हणाले,बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने अन्याय आणि हिंसाचार होत आहे. त्यांच्यावरील अत्याचारांविरोधात आम्ही आवाज उठवला आहे. तसेच, हिंदू समाजाने संघटित राहिले पाहिजे आणि एकजूट राखली पाहिजे”असे आवाहनही त्यांनी केले.
RSSच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपाच्या वेळी संविधान, हिंदू समाज, आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर दत्तात्रय होसबळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली
Leave a Reply