मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना कुणामुळे तुटली यावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरे कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता युवराज असा उल्लेख केला आहे. ते म्हणाले तत्कालीन शिवसेनेच्या युवराजांनी आधीच 151 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचा पक्ष 151 जागांवर अडून बसला होता. आम्ही त्यांच्याकडे 147 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र कौरवांप्रमाणे ते पाच गावे देखील देण्यास तयार नव्हते. त्यामुळे आमच्यातली ‘युती’तुटली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुढं बोलताना फडणवीस म्हणाले की, जेंव्हा युतीची चर्चा सुरू झाली तेव्हा त्यावेळच्या शिवसेनेने मनाशी ठरवले होते की त्यांना 151
जागा लढवायच्या आहेत. आमचा प्रस्ताव असा होता की आम्ही 127 जागांवर निवडणूक लढवू आणि शिवसेना 147 जागांवर निवडणूक लढवेल. तर उर्वरित जागा आम्ही आमच्या युतीमधील छोट्या पक्षाच्या भागीदारांना देणार होतो. या कारणास्तव, आम्ही त्यांना खूप समजावूनसांगितले की, आम्ही 127 जागंवर निवडणूक लढवू आणि तुम्ही 147 जागांवर निवडणूक लढवा. तुमचाच मुख्यमंत्री असेल आणि आमचा उपमुख्यमंत्री असेल. मात्र, ‘तोडगा काढण्यास ते तयार नव्हते, असं फडणवीस म्हणाले.
तर राऊत म्हणाले फडणवीसांना युती तोडायची नव्हती
2014 साली देवेंद्र फडणवीस हे युतीबाबत सकारात्मक होते त्यांना युती तुटू नये, असं वाटत होतं. मात्र, वरिष्ठांकडून जो कार्यक्रम आला त्यानुसार युती तुटली, असं उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 2014 ते 2025 या काळात पुलाखालून बरेच पाणी बाहून गेले आहे. असे असेल तर त्यांनी 2019 बद्दलही बोलले पाहिजे. 2014 ला भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेसोबत युती तोडायची हे ठरून दिल्लीतून
मुंबईत आले होते. चर्चेचे फक्त गुर्हाळ सुरू होते. बाळासाहेब नाहीत यांचा फायदा घेत त्यांना शिवसेना संपवण्याचे त्यांचे धोरण होते. हिंदुत्ववादी आहे असे दाखवत असले तरी शिवसेना संपवण्याचे फरमान घेऊन त्यांचे
नेते दिल्लीतून महाराष्ट्रात आले. त्यांना पोस्टर लावायला जेव्हा माणसं भेटत नव्हती तेव्हा आम्ही त्यांना गावोगावी हिंदुत्वादी म्हणून फिरवले, असं परखडपणे संजय म्हणाले.
Leave a Reply