हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण त्यासाठी दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची आमची परंपरा नाही, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत ठणकावले. त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, ज्याला वाटतं की हिंदू धर्म वाचवायचा संपूर्ण भार त्याच्यावर आहे, असा चिमटा काढत परब यांनी राज्यात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यांच्या या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे शेजारी बसून शांतपणे हासत होते.अनिल परब पुढे म्हणाले, हल्ली काही लोक म्हणतात मांसाहार खाऊ नका. पण त्यांना हा अधिकार कुणी दिला? कोणतं मटण खायचं झटका की हलाल ,हे तुम्ही ठरवणार का? राज्यात हिंदू-मुस्लिम वाद उभे राहतील, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे, तो रात्रभर ‘जागते राहो’ ओरडत असतो. त्याला वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, पण प्रत्यक्षात तसं नाही. आजही असाच एक नेपाळी अंगावर शाल पांघरत फिरतोय आणि स्वतःलाच हिंदू धर्माचा तारणहार समजतोय. पण हिंदू धर्म वाचवायची जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडतो
बोलायचं स्वातंत्र्य आहे, पण मनाला येईल ते बोलणार का?
परब यांनी टीका केली की, “आपल्याला कसं बोलायचं, कसं जगायचं याबाबत संविधान मार्गदर्शन करतं. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्याचा गैरवापर करता येत नाही. आजकाल कोणीही उठतो आणि देव, महापुरुषांची विटंबना करतो. हा प्रकार थांबला पाहिजे
निधी समान वाटप हा संविधानाने दिलेला हक्क आहे. मात्र, केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकारही आमच्यावर अन्याय करत आहे. माझ्या मतदारसंघात 100 कोटींच्या वर्क ऑर्डर्स दिल्या, पण निधी नाही. एका वॉर्डाला पैसे, दुसऱ्याला नाही हा कुठला न्याय?” असा सवाल परब यांनी केला. खालच्या सभागृहात आम्हाला विरोधी पक्षनेता दिला नाही. का नाही दिला? आम्ही अध्यक्षांना विचारलं, पण ते उत्तर देण्यास तयार नाहीत. जर संख्याबळ पुरेसं नसेल, तर तसे अधिकृतरित्या सांगावं, पण अनाकलनीय शांतता पाळली जाते” विधान परिषद सभापती विरोधकांना बोलू देत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. न्याय विलंब म्हणजे अन्याय! विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही, त्यांना दबून टाकण्याचं काम सुरू आहे.
Leave a Reply