मलबार हिल येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिला, ज्या ज्वेलरी दुकान चालवतात, त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायच्या प्रयत्नात सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्या.
महिलेने एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी गुगलवर शोध घेतला. त्यांना एका लिंकवर डॉक्टरचा संपर्क क्रमांक मिळाला आणि तिथे क्लिक करताच त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरील व्यक्तीने स्वतःला रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगत व्हॉट्सअॅपवर अपॉइंटमेंटसाठी एक लिंक पाठवली.
महिलेने विश्वास ठेवून त्या लिंकवर वैयक्तिक आणि बँक तपशील भरला. काही क्षणातच त्यांच्या खात्यातून १६ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल ३.६५ लाख रुपये गायब झाले.
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा
गुगलवरील ‘एडिट अँड सजेस्ट’या सुविधेचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी डॉक्टरचा नंबर हटवून स्वतःचा नंबर जोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी गुगल सर्चवर मिळालेल्या कोणत्याही संपर्क क्रमांकावर त्वरित विश्वास ठेवू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
Leave a Reply