महावितरणची वीज दरकपात स्थगित, राज्याच्या वीज नियामक आयोगाचा निर्णय, घरगुती ग्राहकांसाठी आता जुनेच दर

घरगुती वीजदर कपातीचा निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने स्थगित केला असून, आता ग्राहकांना जुनेच दर मोजावे लागणार आहेत. महावितरणने २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी ८.१८ लाख कोटी रुपयांची महसुली गरज मांडली होती. मात्र, आयोगाने तब्बल १.५४ लाख कोटींची कपात करत ही गरज ६.६४ लाख कोटींवर आणली. त्यानुसार वीजदर कमी करण्याचा निर्णय झाला होता.

महावितरणची पुनरावलोकन याचिका, दरकपातीला तात्पुरती स्थगिती!

महावितरणने मोठ्या महसुली तोट्याची शक्यता व्यक्त करत वीज नियामक आयोगाकडे पुनरावलोकन याचिका दाखल केली. या याचिकेनंतर आयोगाने २९ मार्चला जाहीर केलेली दरकपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला.दर स्थगित झाल्याने आधी जाहीर झालेली दरकपात लागू न होता जुन्या दरांनुसारच बिल आकारले जाईल.

घरगुती ग्राहकांसाठी आता जुनेच दर

वीज वापर चालू दर स्थगिती दिलेले दर

०-१०० ६.३२ ५.६७

१०१-३०० १२.२३ १०.८८

३०१-५०० १६.७७ १४.०७

५०० च्या पुढे. १८.९३ १५.५७

तर पगारही निघणार नाहीत

संपूर्ण राज्यातील २.७५ कोटींहून अधिक ग्राहकांना वीज पुरविणारी महावितरण कंपनी अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. प्रामुख्याने कृषी ग्राहकांकडून वीजदेयक वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने हा तोटा आहे. या स्थितीत वीजदरात इतकी कपात झाल्यास त्याचा महसुलावर परिणाम होऊन प्रसंगी कर्मचाऱ्यांचे पगार काढणेही अवघड होईल, अशी चर्चा महावितरणच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *