कोकणातील सुवासिक, चवदार आणि देश-विदेशात ख्याती मिळवलेल्या हापूस आंब्याला आता अधिकृत ओळखीचं GI (Geographical Indication) टॅगचं संरक्षण मिळालं आहे. या टॅगमुळे आता बनावट हापूसची ओळख पटणार असून, त्याच्या नावाने होणारी फसवणूक थांबेल, अशी दिलासादायक बातमी कोकणातील बागायतदारांसाठी आहे.
हापूस आंब्याच्या उत्पादकांनी एकूण १,८४५ GI टॅग्स मिळवले असून, देशात एखाद्या उत्पादनासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात GI टॅग मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. हा टॅग केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्यांसाठीच अधिकृत आहे.
हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुपुंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूस आंब्याच्या विशिष्ट चव, सुवास आणि रंग यांमुळे त्याला ही ओळख आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यांबाहेरचा कोणताही आंबा ‘हापूस’ या नावाने विकता येणार नाही.
Leave a Reply