जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेत्याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत ९ जणांना चिरडले. या हिट अँड रन घटनेत ३ निरपराध नागरिकांचा बळी गेला असून, उर्वरित ६ जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. परकोटा परिसर, सोमवारी रात्री साडेनऊ वाजता उस्मान खान (वय ५५), जयपूर काँग्रेसचा नेता, दारूच्या नशेत वेगात कार चालवत होता. नाहरगड स्टेशन चौकात त्याने स्कूटीस्वार आणि पादचारी यांना चिरडलं. त्यानंतर वेगात कार नेत संतोषी माता मंदिराजवळ आणखी काहींना उडवलं. रस्त्यावरची गाड्या, दुचाकी त्याने अक्षरशः उडवून दिल्या. एका दुचाकीला कारच्या पुढे अडकवूनही तो थांबला नाही ठिणग्या उडत राहिल्या, लोक भयभीत झाले. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आज सकाळी आणखी एका जखमीन झालेल्या व्यकतीने श्वास सोडला. अपघातानंतर चालक फरार झाला होता, पण काही तासांत पोलिसांनी त्याला अटक केली.डीसीपी राशि डोगरा डुडी यांनी सांगितले की, आरोपी उस्मान खान शास्त्रीनगरचा रहिवासी असून, विश्वकर्मा भागात लोखंडी कारखान्याचा मालक आहे. अटक केल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला. घटनेनंतर काँग्रेसने उस्मान खानला तात्काळ पक्षातून निलंबित केलं आहे. नशेत गाडी चालवून ९ जणांना चिरडणाऱ्या या नेत्यावर आता कायदेशीर कारवाई होणार असून, जयपूरमध्ये या घटनेमुळे संतापाचं वातावरण आहे.

काँग्रेस नेत्याने दारूच्या नशेत कार पळवली, ९ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू
•
Please follow and like us:
Leave a Reply