पुणे : शरद बुट्टेपाटील लिखित ‘संवेदना अंतर्मनाची’ या पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 13 एप्रिल रोजी खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथील पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल राजरत्नमध्ये दुपारी 3 वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक संपादक महेश म्हात्रे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, लेट्सअपचे संपादक यांच्या शुभहस्ते संवेदना अंतर्मनाची या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपआयुक्त सुनील जोशी, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव, डी.के वळसे-पाटील आणि राजेंद्र सांडभोर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राजगुरू शाखेचे मसाप अध्यक्ष संतोष गाढवे, प्राईम प्रिंटर्सचे प्रमोद भावसार व कमलाई प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त यांच्याकडे कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी असणार आहे.
संवेदना अंतर्मनाची या माझ्या ललित लेखन असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, रविवार १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल राजरत्न पुणे नाशिक रोड संतोष नगर भाम येथे आयोजित केला आहे. आपण २.३० पर्यंत उपस्थित राहावे. कार्यक्रम अगदी वेळेवर होईल आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. आपल्याला आनंद मिळेल, प्रेरणा मिळेल अशी काही भाषणे या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतील. माझा हा कार्यक्रम राजकारण विरहित आहे. मी अनेक व्यक्तींबद्दल, घटनांबद्दल, गावांबद्दल संवेदनशील पणाने लिहिलं आहे.आपल्याला प्रवासात देखील माझे हे पुस्तक वाचता येईल असं आहे. आपण या साहित्यिक कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित राहावे, अशी विनंती लेखक शरद बुट्टे पाटील यांनी केली आहे.
Leave a Reply