चंद्रशेखर कोहाड – एक किरकोळ कंत्राटदार. पण सध्या त्याचं नाव ३१४ कोटींच्या आयकर नोटिशीमुळे चर्चेत आहे. एकेकाळी छोट्या कामांसाठी ओळखला जाणारा हा व्यक्ती, आता आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासणीच्या भोवऱ्यात सापडला आहे.कोहाडला यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून समन्सही पाठवण्यात आले होते. मात्र, तो या समन्सला प्रतिसाद देऊ शकला नाही.त्यानुसार २०११-१२ ते २०१५-१६ या आर्थिक वर्षांच्या मूल्यांकनात १८५ कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवण्यात आले. त्यावर व्याज जोडून ही रक्कम ३१४ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
या काळात नागपूरच्या इतवारी भागातील एका सहकारी क्रेडिट सोसायटीत त्याच्या खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार झाले. विशेष म्हणजे कोहाड सांगतो की, त्याला हे व्यवहार कधी झाले याची कल्पनाही नव्हती
२०२० साली व्हिजाग येथून ED ने त्याला समन्स दिला होता, पण तो म्हणतो की प्रवासाचा खर्च झेपत नसल्यामुळे तो तिथे जाऊ शकला नाही. मंगळवारी मात्र, तो मध्य प्रदेशातील मुलताई येथून १२१ किमी बाइकवरून नागपूरला आयकर कार्यालयात हजर झाला. मात्र, संबंधित अधिकारी रजेवर होते. कर्मचाऱ्यांनी त्याला अपील करण्याचा सल्ला दिला.
नागपूरचा रहिवासी असलेला कोहाड आता मुलताईत भाड्याच्या घरात राहतो. तो म्हणतो, “ED चं समन्स घेऊन मी नागपूरला आलो. त्या नोटिशीत ४२ शेल कंपन्यांची यादी होती. त्यांनी विचारलं होतं, मी या कंपन्यांशी संबंधित आहे का?” या कंपन्यांचा मागोवा घेतल्यावर त्या व्हिजागमधील ५६० कोटींच्या हवाला घोटाळ्याशी जोडलेल्या असल्याचं निष्पन्न झालं. या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी महेश वड्डी २०१७ मध्ये अटकेत असून तो या कंपन्यांपैकी किमान पाचमध्ये आजही संचालक आहे.
या कंपन्यांपैकी पहिली पद्मप्रिया स्टोन क्रशिंग प्रायव्हेट लिमिटेड ही व्हिजागमध्ये आहे. अनेक कंपन्यांचे पत्ते कोलकात्यातील लेक टाउनमध्ये एकाच ठिकाणी आहेत, उरलेल्या कंपन्या दिल्ली, पुणे आणि सिकंदराबाद येथील आहेत.
कोहाडच्या खात्यावर सहकारी बँकेत मोठ्या रकमा आल्यामुळे त्याच्यावर उत्पन्न दाखवलं गेलं आणि कर विभागाने नोटीस बजावली. तो म्हणतो, नेमकी कोणती सोसायटी होती ते आठवत नाही – श्रीनाथ मंगलम की फक्त मंगलम इतवारीच्या टोंगा स्टँडजवळ होती.
त्याने सांगितलं की, तो दररोजचे पैसे जमा करण्यासाठी सहकारी सोसायटीला प्राधान्य देत होता. मात्र, नक्की किती पैसे त्याचे स्वतःचे होते, हेही आता त्याला आठवत नाही. ही सोसायटी नंतर बंद झाली, आणि घोटाळा उघडकीस आल्यानंतर तिचे खातेही सील करण्यात आले.
कोहाड म्हणतो की, त्याच्यासारख्या १०-१५ जणांच्या खात्यातही अशीच मोठी रक्कम जमा झाली होती. त्याचा आरोप आहे की, सोसायटीच्या व्यवस्थापनाने त्याचे खाते मनी लॉन्डरिंगसाठी वापरले.माझ्या खात्यात किती पैसे आले याची कल्पनाही नाही. केवळ कर ३१४ कोटींचा असेल तर आत किती पैसा फिरला असेल, याचा तुम्ही विचार करा, असं तो म्हणतो.संध्याकाळपर्यंत दमलेला कोहाड नागपूरमध्ये एक दिवस थांबायचं ठरवतो. त्याचे मित्र सांगतात की, त्याच्याकडे फारशी सोय नाही. सध्या तो मुलताईत एका भाड्याच्या घरात राहतो.
Leave a Reply