मुंबईकरांसाठी सायबर फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ‘डिजिटल रक्षक’ नावाची नवी हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तींना थेट फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांशी संपर्क करता येणार आहे.
या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना सायबर फसवणुकीबाबत समुपदेशन दिले जाईल तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करून मदत करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिसांनी दोन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत ७७१५००४४४४ आणि ७४०००८६६६६. या क्रमांकांवर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधता येऊ शकतो.
‘डिजिटल रक्षक’ ही सेवा २४ तास कार्यरत राहणार असून, फसवणूक होण्यापूर्वीच नागरिकांना संशयास्पद कॉल्स आणि बनावट सरकारी कागदपत्रांची सत्यता तपासता येईल.
तसेच, घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून तत्काळ प्रतिसाद मिळेल, आणि गरज असल्यास सायबर पोलिसांचे अथवा स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक पाठवले जाईल. फसवणूक झालेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून त्यांना मानसिक व कायदेशीर मदत दिली जाणार आहे.
Leave a Reply