पुण्यातील प्रसिद्ध मिठाई निर्माता चितळे बंधू यांच्या ब्रँडचे गैरवापर करून एक मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘चितळे स्वीट होम’च्या मालकाने चितळे बंधू ब्रँडच्या नावाचा वापर करून पुण्याच्या प्रसिद्ध बाकरवडीचे उत्पादन तयार केले आणि त्याची विक्री ऑनलाइन तसेच ऑफलाइन केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चितळे बंधू यांच्या मिठाईच्या चवीत फरक जाणवला असल्यामुळे ग्राहकांनी तक्रारी केल्या. तक्रारदार नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी बाजारातील बाकरवडीचे पाकिट खरेदी करून त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान, चितळे बंधू यांच्या बाकरवडीच्या चवीत तसेच पाकिटाच्या डिझाइनमध्ये फरक आढळला. यावरून हे लक्षात आले की, ‘चितळे स्वीट होम’च्या नावाने बाकरवडी विकली जात होती. यामुळे ग्राहकांचा विश्वास धक्का बसला.
त्यानंतर, चितळे बंधू मिठाईवाले यांच्या भागीदार इंद्रनील चितळे यांनी पोलिसांना तक्रार केली. त्यांनी सांगितले की, ‘चितळे स्वीट होम’ने चितळे बंधू ब्रँडचा अधिकृत ई-मेल आयडी, ग्राहक नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि संपर्क क्रमांक वापरून बाकरवडी विक्री केली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, चितळे स्वीट होमच्या मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(२), ३५० आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
चितळे बंधू ब्रँडच्या मिठाईच्या चवीत आणि डिझाइनमध्ये फरक दिसून आल्यामुळे स्पष्ट झाले की, ‘चितळे स्वीट होम’ने ‘चितळे बंधू’ ब्रँडचा नावाचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केली.
Leave a Reply