केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले की, काही लोक औरंगजेबाचे महिमामंडन करून त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्याने प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणारा, हिंसक आणि अत्याचारी शासक कधीही आपला नायक होऊ शकत नाही.ते कॅनॉट गार्डन परिसरातील शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.राजनाथ सिंह म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांची स्मारके आजच्या पिढीला प्रेरणा देतात. पं. नेहरू यांनी आपल्या पुस्तकात आणि इतिहासातही औरंगजेबाला क्रूर शासक म्हणूनच दर्शवले आहे. त्याने मराठा, राजपूत आणि शिखांवर अतोनात अत्याचार केले आणि हिंदू मंदिरे नष्ट केली.औरंगजेबाचे महिमामंडन करणारे लोक दारा शुकोव्हबाबत बोलत नाहीत. महाराणा प्रतापसिंहांसोबत असलेल्या अदिलखान सुरीबाबतही बोलत नाहीत. मुळात दारा शुकोव्ह हे योगी, संन्यासी, वेद व कुराणाचा सन्मान करायचे. त्यांची हत्या औरंगजेबाने केली.
महाराणा प्रतापसिंहांसोबत असलेल्या अदिलखान सुरीबाबतही बोलत नाहीत. मुळात दारा शुकोव्ह हे योगी, संन्यासी, वेद व कुराणाचा सन्मान करायचे. त्यांची हत्या औरंगजेबाने केेली. अशा अत्याचाऱ्याचे नाव या शहराला होते, ते बदलून छत्रपती संभाजीनगर केले, तर काय फरक पडतो? औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम केले तर काय फरक पडतो? महाराणा यांच्यासोबत आदिवासी, मुस्लिमदेखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही मुस्लिम होते. औरंगजेबाचे समर्थन करून पाकिस्तानला तेथील मुस्लिमांचे समर्थन मिळेल, मात्र येथे मिळणार नसल्याचे ते म्हणाले.या भाषणात राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांचा गौरव करत, त्यांच्या संघर्षाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, मेवाड नरेश लक्ष्यराजसिंह यांची भाषणे झाली. पणनमंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, शिरीष बोराळकर, कृपाशंकरसिंह, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरू तेगबहादूर आणि महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास सदैव प्रेरणादायी राहील.” त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करत म्हटले की, “महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. त्यांचा संघर्ष आणि धैर्य हे आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले, महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हे प्रेरणास्त्रोत आहेत. हे पुतळे फक्त त्यांचे स्मरण ठेवत नाहीत, तर त्यांच्या बलिदान आणि धैर्याचा संदेश देखील नव्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
Leave a Reply