मित्रहो, ही कुठली पत्रकारिता?

मराठी पत्रकारिता कुठल्या वळणावर पोहोचली आहे, हे मी पत्रकार असल्यामुळे जास्त कधी बोलत नाही. पण मराठी पत्रकारितेत झालेला हा लक्षणीय बदल अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बोलावसं वाटलं. तुम्हीच पहा, आपल्या पत्रकारितेची घसरण दर्शविण्यासाठी आजच्या पुढील दोन बातम्या पुरेशा आहेत… माझ्यासाठी त्या बातम्या नसून, मन हादरवून टाकणारे पत्रकारितेचे विदारक स्वरुप आहे… मला बातमीत, “बात” असावी मी नसला पाहिजे. असे माझ्या संपादकांनी शिकवले होते. पण पुढील दोन बातम्या पहा, इथे बात म्हणजे, वृत्त राहिले बाजूला, बातमीदार, उपसंपादक कार्यकर्ते बनून ताई आणि साहेबांची भेट रंगवून सांगताहेत…

“लोकमत” मधील चार ओळीत शरद पवार यांचे वर्णन पहा… “आदरणीय शरद पवार साहेब” आणि आई प्रतिभा काकी … अहाहा… ABP माझा तर त्याहून पुढे जाऊन या “अतिशय महत्वपूर्ण” भेटीचे वर्णन करताना काय बातमी देतो… भर उन्हात रस्ता ओलांडून लेक बापाच्या भेटीला…
वाह रे वाह, आले भले बहाद्दर पत्रकार,
यांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात उन्हातान्हात पाण्यासाठी पायपीट करणार्‍या आमच्या आयाबहिणी दिसत नाही. यांना शेतात जीव देणारा शेतकरी बांधव दिसत नाही… जीवाचा आटापिटा करून लोकल ट्रेन पकडण्यासाठी धावणार्‍या माता भगिनी दिसत नाही…


पण दररोज भेटणारे शरद पवार आणि सुप्रिया ताई यांची “धावती भेट” त्यांना ब्रेकिंग न्यूज वाटते. धन्य झालो !

लाज आणता दोस्तहो… पत्रकारिता इतकी पण रस्त्यावर उतरवू नका राव…

महेश म्हात्रे
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *