सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोमवारी सोनं एक लाखांवर जाऊन पोहोचलं आहे. भारतात कमोडिटी एक्सचेंजनुसार गोल्ड फ्युचर्स सुरुवातीला 1196 रुपयांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी उसळले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,450 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर जीएसटीसह सोनं शुद्ध सोने जीएसटीसह 101000 रुपये (एक लाख एक हजार रुपये) प्रति तोळावर पोहोचले आहे. सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे.
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात
काय आहेत सोन्याचे दर!
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 90,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 98,350 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,760 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,015 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,835 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,376 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 72,120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 78,680 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,008 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 90,150 रुपये
24 कॅरेट- 98,350 रुपये
18 कॅरेट- 73,760 रुपये


Leave a Reply