विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षाविययक गंभीर त्रुटी आढळून आल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून दोषी पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे 15 व 16 मार्च रोजी बारामती दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांच्या सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याची गंभीर बाब समोर आली होती.याप्रकरणी सुरक्षाविषयक त्रुटींविषयी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. आता या चौकशीत कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशीचे आदेश पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते. या अहवालानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र कोळी आणि पोलिस निरीक्षक वैशाली पाटील हे दोषी आढळून आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गायकवाड, शामराव गायकवाड पोलिस शिपाई रोहित वायकर आणि हेड कॉन्स्टेबल सारिका बोरकर यांना दंडनीय कारणे दाखवा नोटीस पाठवून खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.
Leave a Reply