यवतमाळची आदिबा अनम अश्फाक अहमद ही महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) बनणार आहे. नुकतंच UPSC चा निकाल जाहीर झाला. देशभरातून 1009 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यापैकी आदीबा हिचा ऑल इंडिया रँक हा 142 वा आला आहे. या निवडीनंतर तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून कठीण परिस्थितीत तिने अभ्यास करत हे यश मिळवले आहे. तीनदा अपयश आले तरी तिने आपला ध्येय सोडला नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास करून तिने जगातील सर्वात कठीण असणाऱ्या परीक्षेत 142 वा रँक प्राप्त केला आहे. ती यवतमाळ येथे कळंब चौकात आपल्या मोठ्या चुलत्याकडे राहते. त्यांचे स्वतःचे मालकीचे घर देखील नाही. शायर अश्फाक शाद हे तिचे वडील असून ते भाड्याने रिक्षा चालवतात. रिक्षाचालकाची मुलगी आयएएस होणार असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अदिबाचे प्राथमिक शिक्षण जाफरनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून झाले. अकरावी, बारावी विज्ञान शाखेत जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट ज्युनिअर कॉलेज यवतमाळ येथून पूर्ण केले. पुढे गणित विषय घेऊन बी. एससी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर युनिक अकॅडेमी पुणे येथून यूपीएससीची शिकवणी घेतली. त्यानंतर मुंबई हज हाउस आयएस प्रशिक्षण संस्थेमध्ये राहून अदिबाने यूपीएससीचा अभ्यास केला. नंतर जामिया इस्लामी युनिव्हर्सिटीत तिने अभ्यास केला.चौथ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले आणि स्वप्न पूर्ण झाले असे अदिबाने सांगितले. तीनदा अपयश आल्यावरही निर्धार न सोडता अदिबा अनमने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश मिळवले. यूपीएससीमध्ये १४२ वा क्रमांक प्राप्त करत अदिबाला महाराष्ट्रातील पहिली मुस्लीम महिला आयएएस बनण्याचा बहुमानही मिळणार आहे. तिच्या यशाचा संघर्ष सर्वच समाजातील मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी असा आहे.
UPSC परीक्षेकडे मुस्लीम उमेदवारांचा ओढा वाढला
पहिल्या शंभरमध्ये दोन मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे यामध्ये इराम चौधरी (४०रँक ) फरखंडा कुरेशी(६७ रँक) हे आहेत. पहिल्या तीनशेमध्ये सहा मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. २००९ मध्ये शाह फैसला या मुस्लीम तरुणाने देशात अव्वल स्थान मिळवल्यानंतर मुस्लीम उमेदवारांचा यूपीएससी परीक्षेमधील ओढा वाढला आहे. यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या मुस्लीम
उमेदवारांची पाच वर्षातील आकडेवारी पाहिली असता, नागरी सेवा परीक्षा २०२४ मध्ये २८, २०२२मध्ये ५१, २०२२मध्ये २९, २०२१मध्ये२५ आणि २०२० मध्ये ३१ उमेदवार यशस्वी झाले आहेत. दरवषी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या ही
जवळपास सारखी आहे.


Leave a Reply