“श्रीलंकेत भारतातील उद्योगांना प्रचंड संधी , तुम्ही या आणि तुमचे उद्योग उभारा ” असे आवाहन श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख श्रीमती शिरणि आर्यारत्ना यांनी केले आहे.
श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम कुलाबास्थित ताज हॉटेल जवळील रॉयल मुंबई यॉट क्लबच्या अँकरेज रूममध्ये पार पडला.
यावेळी श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख श्रीमती शिरणि आर्यारत्ना यांनी श्रीलंकेमधील प्रगतीचा आढावा घेणारे, तेथील उद्योग व्यवसायातील संधी संदर्भात माहिती देणारे प्रेझेंटेशन सादर केले. कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलताना महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक महेश म्हात्रे यांनी भारत – श्रीलंका या दोन देशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांचा आढावा घेतला.
श्रीलंकेच्या कार्यवाहक कॉन्सुल जनरल श्रीमती शिरणि आर्यारत्ना , प्रख्यात वकील उदय नाईक, प्रोटोकॉलप्रमुख मिलिंद हरदास, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण लुनकड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामवंत आर्किटेक्ट आणि ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे संस्थापक संजय भिडे यांनी केले.चेंबरचे पदाधिकारी प्रा.सौ. सोनचाफा भिडे, श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासातील, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Leave a Reply