दोन दिवसांपूर्वी पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिल रोजी बुलढाणा दौऱ्यावर असताना, गायकवाड यांच्याविरोधातील ही कारवाई म्हणजे गृह विभागाने दिलेला स्पष्ट संदेशच मानला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी माघार घेत आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
२५ एप्रिल रोजी गायकवाड यांनी पोलिसांची कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते, “पोलिसां इतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि भारत सोडून जगात कुठेच नाही. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, एखादा कठोर कायदा केला की एक हप्ता वाढतो. पोलिसांनी एखाद्या कारवाईत ५० लाख पकडले की ५० हजार दाखवतात. पोलिसांनी इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते.” या वक्तव्यानंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्वतः पोलिसांच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांविषयी द्वेष आणि नकारात्मक भावना पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…?
वादग्रस्त विधान केल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर आता केवळ गुन्हाच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही रोष ओढावला आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की, “गायकवाड यांना कडक समज द्या. हे असे चालणार नाही, हे चुकीचे आहे.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत तंबी देताना म्हटले की, “पोलिसांबद्दल अशा प्रकारे बोलणे अजिबात योग्य नाही. जर ते वारंवार असेच वक्तव्य करत राहिले, तर कठोर कारवाई करावी लागेल.” मुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेनंतर आमदार गायकवाड यांनी आपली एक पाऊल मागे घेत, आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे
पोलिसांविरोधातील वादग्रस्त विधानावरून उठलेल्या वादळानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर स्पष्टोक्ती दिली आहे. “हे विधान मी माझ्या अनुभवाच्या आधारे केले होते. मात्र जर माझ्या बोलण्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची आणि सरकारची प्रतिमा मलिन होत असेल, तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे मला कळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील मला फोन आला होता.”माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारले, आपण आपल्या विधानावर अजूनही ठाम आहात का?” यावर उत्तर देताना आमदार गायकवाड म्हणाले, “त्या दिवशी चुकून ‘महाराष्ट्र पोलीस’ असा उल्लेख झाला. पोलिसांविरोधातील वादग्रस्त विधानावरून उठलेल्या वादळानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर स्पष्टोक्ती दिली आहे.
यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे मला कळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील मला फोन आला होता.”माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारले, “आपण आपल्या विधानावर अजूनही ठाम आहात का?” यावर उत्तर देताना आमदार गायकवाड म्हणाले, “त्या दिवशी चुकून ‘महाराष्ट्र पोलीस’ असा उल्लेख झाला. माझा रोष हा स्थानिक पातळीवरील कार्यपद्धतीवर होता, संपूर्ण पोलिस दलावर नव्हे. त्या स्थानिक बाबतीत मी अजूनही ठाम आहे.”


Leave a Reply