शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगाच्या नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव सतीश बाविस्कर (वय १९) असे असून, तो महाविद्यालयाजवळील वसतिगृहात वास्तव्यास होता. सतीश हा अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास सतीशने महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेल्या झाडाला दप्तरासह गळफास घेत आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या भावना इंस्टाग्राम स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केल्या तो म्हणाले ‘माझ्याने सहन होत नाही जानू आता; जातो मी सगळ्यांना सोडून’ अशी पोस्ट त्याने लिहिली. काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी महाविद्यालय प्रशासन व पोलिसांना तत्काळ माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविला.या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

नूतन मराठा कॉलेजमधील धक्कादायक घटना; कॉलेजच्या प्रांगणात तरुणाची आत्महत्या
•
Please follow and like us:
Leave a Reply