एनसीईआरटीने इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या नवीन पुस्तकात मोठे बदल केले असून, मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकले आहेत. याऐवजी, भारतीय राजवंशांचे, पवित्र भूगोलाचे, महाकुंभाचे संदर्भ आणि मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांचा समावेश करण्यात आले आहे.
या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट (NCFSE) २०२३ च्या अनुषंगाने भारतीय परंपरा, तत्वज्ञान आणि ज्ञान प्रणालीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. शालेय शिक्षणात स्थानिक संदर्भांचा समावेश करण्यावर जोर देण्यात आला आहे. एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हे पुस्तक फक्त पहिला भाग आहे आणि दुसरा भाग लवकरच प्रकाशित होईल. दुसऱ्या भागात वगळलेल्या भागांचा समावेश होईल की नाही, यावर त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही.
२०२२-२३ मध्ये कोविड-१९ साथीच्या काळात अभ्यासक्रमातील काही घटक कमी केले होते. त्यानंतर, मुघल सम्राटांची कार्ये आणि दिल्ली सल्तनतवरील संदर्भ आधीच कमी केले गेले होते, परंतु आता पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. नवीन पाठ्यपुस्तकात मुघल आणि दिल्ली सल्तनतचा कोणताही उल्लेख नाही. नवीन पुस्तकात “एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड” या सामाजिक विज्ञान विभागात प्राचीन भारतीय राजवंशांवर आधारित नवीन प्रकरणे समाविष्ट केली आहेत. यामध्ये मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन राजवंशांचा समावेश आहे. तसेच, भारतीय नीतिमत्तेवर आधारित चर्चाही करण्यात आले आहे.
या पुस्तकात “पवित्र भूगोल” या संकल्पनेचा समावेश आहे, ज्यात १२ ज्योतिर्लिंगे, चार धाम यात्रा आणि शक्तीपीठे यासारख्या धार्मिक स्थळांचा सविस्तर उल्लेख आहे. महाकुंभ मेळ्याचा उल्लेख करतांना ६६ कोटी लोकांनी त्यात भाग घेतला असल्याचे म्हटले आहे, मात्र चेंगराचेंगरीत ३० यात्रेकरूंच्या मृत्यूचा उल्लेख केलेला नाही. पुस्तकात मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि अटल बोगदा यासारख्या सरकारी योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानावर एक प्रकरण देखील आहे, ज्यात तिरंगा ध्वज फडकवण्याच्या अधिकाराची न्यायालयाने कशी मान्यता दिली याचा उल्लेख आहे.
तसेच, इंग्रजीच्या “पूर्वी” या पाठ्यपुस्तकात भारतीय लेखकांच्या १५ कथा, कविता आणि कथानकांचा समावेश आहे. यामध्ये रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम आणि रस्किन बाँड यांच्या कृत्यांचा समावेश आहे. या बदलांवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे, त्यांना असे वाटते की हे बदल भगव्याकरण ला समर्थन देत आहेत. एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी यावर्षी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, “दंगलींबद्दल शिकवल्याने लहान मुले नकारात्मक नागरिक बनू शकतात.


Leave a Reply