महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा : एकनाथ शिंदे

‘महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर सरकारी स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

महामंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्र्यांची गती वाढविण्याची सूचना”

सह्याद्री अतिथीगृह येथे शनिवारी उपमुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या गृहनिर्माण कामाचा आढावा घेतला. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना गती देऊन अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले. गृहनिर्माण राज्यमंत्री आणि महामंडळाचे सहअध्यक्ष डॉ. पंकज भोयर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, आणि म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह या बैठकीस महापालिका आयुक्त, महावितरण आणि अन्य संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले, “गरीब आणि सामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. महाहौसिंगसारख्या महामंडळांनी आपल्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गती देऊन जास्तीत जास्त गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. महामंडळाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. यासाठी आम्ही तातडीने महापालिका आयुक्त, महावितरण आणि इतर यंत्रणांना निर्देश देऊन कामे सोडवू.याशिवाय, घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेत २१ हजार ३५ सदनिकांची उपलब्धता; केंद्र आणि राज्य सरकारची महत्त्वपूर्ण मदत

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प व मध्य उत्पन्न घटकांसाठी शासकीय जमिनीवर किंवा खाजगी जमिनीच्या मालकांसोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांचे निर्माण करणारे गृहनिर्माण प्रकल्प महामंडळामार्फत राबवले जात आहेत. यासाठी ६०० कोटी रुपयांचे भाग भांडवल प्राप्त झाले आहे.महाहौसिंगमार्फत आतापर्यंत बारामती येथील आंबेडकर वसाहत प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर आणि नागपूर या भागात सात नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहेत, ज्यामध्ये २१ हजार ३५ सदनिका उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारकडून या प्रकल्पांसाठी १०८ कोटी ५९ लाख रुपये अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून, राज्य शासनाकडूनही ६८ कोटी ५४ लाख रुपये मिळाले आहेत.

टिटवाळा आणि खंडाळा येथील गृहप्रकल्पांना गती; आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी सुलभ गृह कर्ज सुविधा”

टिटवाळा आणि खंडाळा येथील दोन महत्त्वपूर्ण गृहनिर्माण प्रकल्पांसाठी नियोजन सुरु आहे. बांधण्यात आलेल्या घरांची विक्री ‘बुक माय होम्स’द्वारे केली जात आहे, आणि साधारणतः १५ लाख रुपयांपर्यंत एका सदनिकेची विक्री किंमत निश्चित करण्यात आलेली आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना सुलभ गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसोबत सामंजस्य करारही करण्यात आला आहे. तथापि, या प्रकल्पांना सध्या काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. डीपी रस्त्याचे काम, सांडपाणी आणि पावसाळी पाणी निचरा करणं, वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या बाबींच्या कामांसाठी महाहौसिंगच्या स्तरावर सतत पाठपुरावा केला जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *