महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत महाराष्ट्रात ठोस कारवाई झाली असून सर्व संबंधित नागरिक सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते पुढे म्हणाले की,ज्यांना भारत सोडावे लागणार आहे, त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. कोणताही असा पाकिस्तानी नागरिक नाही जो आमच्या नजरेतून सुटला आहे. लवकरच या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली जाईल.”फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले की, सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहे. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना देश सोडावे लागणार आहे. त्या लोकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. धर्म विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, देशभरातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. जे नातेवाईक त्या ठिकाणावरची परिस्थिती सांगत आहे त्यांना खोटे ठरवले जात आहे. हे खूप वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावा की अन्य काही, हे सांगण्यास माझ्याकडे शब्द नाही. त्यांना मृत्यूमुखी पडलेल्या लोकाबद्दल संवेदना नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली,धर्म विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते.त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, देशभरातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. जे नातेवाईक त्या ठिकाणावरची परिस्थिती सांगत आहे त्यांना खोटे ठरवले जात आहे. हे खूप वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावा की अन्य काही, हे सांगण्यास माझ्याकडे शब्द नाही. त्यांना मृत्यूमुखी पडलेल्या लोकाबद्दल संवेदना नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने तब्बल अडीच वर्ष बुलेट ट्रेनचं काम थांबवून ठेवलं होतं, त्यामुळे आपण त्या प्रकल्पात अडीच वर्ष मागे गेलो. या दरम्यान गुजरात बुलेट ट्रेनच्या कामात खूप पुढे निघून गेला.आमच्या सरकारने पुन्हा काम वेगात सुरू केलं असून आता प्रकल्प मोठ्या प्रगतीपथावर आहे. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *