मुंबईच्या वांद्रेतील एका मॉलमध्ये भीषण आग, क्रोमा शोरूम जळून खाक

मंगळवारी सकाळी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी ‘फायर-रोबोट’ घटनास्थळी पाठवला. त्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची प्रथम नोंद पहाटे ४:११ वाजता झाली, त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने पहाटे ४:४९ वाजता ती लेव्हल-III आग असल्याचे घोषित केले. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, आग फक्त तळघरापर्यंत मर्यादित होती.

अग्निशमन दलासह, मुंबई पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि स्थानिक महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १२ अग्निशमन दलाच्या गाड्या, ९ जंबो वॉटर टँकर, २ श्वासोच्छवास उपकरणे व्हॅन, १ बचाव पथक आणि १ जलद प्रतिसाद वाहन आणि ‘अग्निशमन रोबोट’ घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय १०८ रुग्णवाहिका सेवा देखील सज्ज ठेवण्यात आली होती. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. त्या छोट्या भागात दाट धुराचे प्रमाण दिसून आले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी ३ लहान पाईप आणि १२ मोटर पंप वापरले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की याच्या एक दिवस आधी, दक्षिण मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयातही मोठी आग लागली होती, ज्यामुळे मुंबईतील सुरक्षा आणि अग्निशमन व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची अतिरिक्त आयुक्ताच्या पातळीवर सर्वकष चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका आयुक्ताना दिले. आगीत इमारत आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार झिशान सिद्वीकी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे मिळणे आवश्यक आहे,असं शेलार म्हणाले.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *