‘जबाबदारीच्या वेळी गायब’ म्हणत काँग्रेसची पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष टीका; भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र सरकारला ठाम पाठिंबा दर्शवला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर एक वादग्रस्त फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कुणाचंही चेहरा दिसत नाही, मात्र त्यातील पोशाख हा पंतप्रधान मोदी यांच्या विशिष्ट वेशभूषेशी मिळता-जुळता आहे. थेट नाव न घेता काँग्रेसने अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे.या फोटोवर ठळकपणे “बेपत्ता” असे मोठ्या अक्षरांत लिहिण्यात आले असून, त्यासोबत कॅप्शन देण्यात आलं आहे – “जबाबदारीच्या वेळी गायब.”

भाजपचे नेते काय म्हणाले?

काँग्रेसने आपल्या एक्स हॅण्डलवर पोस्ट केलेल्या वादग्रस्त फोटोवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘शीर धडापासून वेगळं असा फोटो वापरून कोणत्याही शंका गडद केली आहे. हे फक्त राजकीय विधान नाहीये. हे मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या विरोधात एक पडद्याआडून केलेली चिथावणी आहे.’राहुल गांधी अनेक वेळा पंतप्रधान मोदींविरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे आणि ते योग्य ठरवलं आहे. पण, काँग्रेस काही यशस्वी ठरली नाही. कारण पंतप्रधानांच्या पाठीशी लाखो भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे’, असे मालवीय म्हणाले.

भाजपचे खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची अशी काय कमजोरी आहे की, त्यांना पाकिस्तानची भाषा बोलण्याची गरज पडते? ते पाकिस्तानचं समर्थन का करत आहेत? त्यांना भारतीयांच्या हत्या झालेल्या बघून राग येत नाही का?’, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी केला. काँग्रेस कोणासोबत उभी आहे, भारतासोबत की, पाकिस्तानसोबत? सर्जिकल स्ट्राइक केला, त्यावेळीही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. आताही थोडा काळ गेला आणि काँग्रेसने भारतावरच प्रश्न उपस्थित करणे आणि पाकिस्तानची बाजू घेणं सुरू केलं आहे’, अशी जोरदार टीका अनुराग ठाकूर यांनी केली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *