कुलदीपची चापट आणि रिंकूचा राग ; सामन्यानंतरचा ‘ड्रामा’ व्हिडीओ व्हायरल”

आयपीएल 2025च्या 48व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यानंतर एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंग एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात.मात्र, गप्पांदरम्यान कुलदीपने अचानक रिंकूच्या कानाखाली हलकेच थाप दिली, आणि त्यावर रिंकूही थोडा चिडलेला दिसतो.

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. तर, रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. हा व्हिडीओ सामन्यानंतरचा आहे, ज्यामध्ये दोन्ही संघाचे खेळाडू प्रत्येक सामन्यानंतर जसे एकमेकांशी बोलतात, अगदी तसंच सर्वजण एकमेकांशी बोलत आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना कुलदीप यादव रिंकूला काहीतरी बोलतो आणि खाडकन त्याच्या कानाखाली मारतो. रिंकू आधी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि कुलदीपकडे दुर्लक्ष करतो. पण कुलदीप रिंकूच्या कानाखाली मारतो आणि रिंकूचा चेहरा रागानं लाल होतो. रिंकू रागात कुलदीपकडे एकटक पाहत बसतो.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 च्या 48व्या सामन्यात दमदार कामगिरी करत 204 धावांचा डोंगर उभारला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या फलंदाजांनी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियममध्ये फटकेबाजीचा धडाकाच उडवला. प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात डळमळीत झाली, पण फाफ डु प्लेसिसने डाव सावरत सामना रंगात आणला.डु प्लेसिसने 45 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याला अक्षर पटेलनेही उत्तम साथ दिली आणि केवळ 23 चेंडूंमध्ये 43 धावांचा झणझणीत फटका दिला. शेवटी विपराज निगमनेही 19 चेंडूंमध्ये 38 धावा काढत विजयासाठी झुंज दिली, मात्र दिल्लीला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला.

या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या असल्या तरी सामन्यानंतर पॉईंट टेबलमधील केकेआरच्या रँकमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्स 12 पॉईंटसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, कोलकाता 9 पॉईंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *