भारतात 10 हजार सिनेमागृहांपैकी सर्वाधिक साऊथमध्ये; आमिर खानने व्यक्त केली चिंता

”आपल्या देशात सिनेमागृहे खूपच कमी आहेत. आणि ज्या 10 हजार आहेत त्यापैकी निम्मे दक्षिण भारतात आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरत असल्याचं”, सिनेअभिनेता आमिर खान यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर तो म्हणतो की भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत थिएटर्स खूपच कमी आहेत. त्या तुलनेत अमेरिकेत 40 हजार तर चीनमध्ये 90 हजार सिनेमागृहे आहेत, असं आमिर खान म्हणतात. ‘वेव्हज २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत दुस्या दिवशी ‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर :पुटिंग इंडिया ऑन द वर्ल्ड स्टडिओ मॅप” या चर्चांसाहित भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्यासंदर्भात विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यादरम्यान आमिर खान बोलत होता.

या चर्चासत्रात अभिनेता आमिर खानसह निर्माते नमित मल्होत्रा, दिनेश विजन, अजय बिजली, रितेश सिधवानी आणि चार्ल्स रोव्हन सहभागी झाले होते. हिंदी चित्रपटसूष्टीच्या पायाभूत सुविधा उभारणीविषयी महत्वपूर्ण चर्चा झाली. व्यवसायासाठी नव्हे, तर भारतातील सांस्कृतिक बाजू जपण्यासाठी अधिकाधिक थिएटर्सची निर्मिती आवश्यक असल्याचे आमिर म्हणाले. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सिनेमागृहाची संख्या खूपचकमी आहे. या कारणांमुळे केवल दोन टक्के प्रेक्षक सिनेमागृहांपर्यत पोहोचतो, असा मुद्द अमिर यांनी उपस्थित केला.

भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटसुद्धा केवळ तीन कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. जे एकूण लोकसंख्येच्या दोन टक्केच आहेत. उर्वरित ९८ टक्के प्रेक्षक कुठे आ्णि कसे चित्रपट पाहत आहेत ? कोकणात थिएटर्स नाहीत. तिथल्या
लोकांनी सिनेमा कुठे पाहायचा पंजाबमध्येही काही जिल्ह्यांत थिएटर्स नाहीत. जिथे थिएटर्स आहेत
तिथे बनवू नका. जिथे नाहीत तिथे खूप वाव आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे लोकांची चित्रपटांबद्दलची उत्सुकता कमी होत असून या माध्यमाच्या
हव्यासापोटी चित्रपट निर्माते स्वतःचाच व्यवसाय मारत आहेत, असं आमिर खान म्हणाले.

ओटीटी एक मजेदार बिझनेस मॉडेल आहे. पूर्वी चित्रपट थिएटर्समध्ये आल्यावर एक वर्षांनी ओटीटीवर यायचे. नंतर तो कालावधी 8 महिन्यावरून 6 महिन्यांवर आला. आता प्रेक्षकांना चित्रपटगृहात येऊच नका. त्यामुळे चित्रपटाच्या आर्थिक गणितावर त्याचा परिणाम होतो,असं आमिर खान यांनी चर्चासत्रात आपले मत मांडले.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *