मुंबईत आणखी एक २०० एकरवर चित्रनगरी तयार होणार असून त्यासाठी करारावर साह्य देखील झाल्या आहेत. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वेव्हज २०२५ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. ३ हजार कोटी रुपये खर्चून २०० एकरावर चित्रनगरी उभारण्यात येणार असल्याचे या परिषदेत सांगण्यात आले. त्यासाठी सरकारने दोन ते तीन जागांचे पर्याय दिल्याचे ‘प्राइम फोकस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमित मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.
यात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरले जाईल. तसेच मनोरंजन पार्क व पर्यटकांना राहण्यासाठी सुविधा असेल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल. या करारावर राज्य शासनाच्यावतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी तर प्राइम फोकसच्या वतीने नमित मल्होत्रा यांनी स्वाक्षरी केली आहे. याचसोबत पनवेलमध्ये भव्य स्टुडिओ उभारला जाईल ‘गोदरेज’बरोबर पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्यासाठी करार झाला आहे. या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ६०० रोजगारनिर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्यात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १९०० रोजगारनिर्मिती होईल तर हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर २५०० रोजगारनिर्मिती होईल. याबाबतच्या करारावर गोदरेजच्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी स्वाक्षरी केली
Leave a Reply