लवकरचं भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार असल्याचं स्वतः सीईओ टीम कुक हे म्हणाले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. कुक म्हणाले की, भारत लवकरच अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचा मूळ देश बनेल. ते म्हणाले की एअरपॉड्स, अॅपल वॉच सारखी इतर उत्पादने देखील बहुतेक व्हिएतनाममधून आयात केली जात आहेत. चीनच्या तुलनेत कमी दरांमुळे कंपनी भारत आणि व्हिएतनामला प्राधान्य देत आहे. चीनमधील उच्च आयात शुल्काच्या तुलनेत भारत आणि व्हिएतनाममधून आयातीवर फक्त १०% कर आहे.
कंपनींने भारतासह अनेक देशांमध्ये तिमाही निकाल जाहीर केले मात्र, चीनमध्ये सर्वाधिक आयफोनची निर्मिती होत असून सलग सातव्या तिमाहीत आयफोनच्या विक्रीत घट नोंदवली आहे. यामुळे आगामी काळात भारत आयफोन निर्मितीचे मुख्य केंद्र बनणार आहे. तर अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयपॅड, मॅक, ऑपल वॉच आणि एअरपॉडची निर्मिती व्हिएतनाममध्ये केली जाईल. तर अमेरिकेबाहेर इतर देशात विकल्या जाणाऱ्या अंपल आयफोनचे उत्पादन चीनमध्ये केले जाईल, असे कूक म्हणाले.
एसअँडपी ग्लोबलच्या विश्लषणानुसार, २०२४ मध्ये ऑपलने अमेरिकेत ७.५९ कोटी आयफोनची विक्री केली. ज्यापैकी ३१ लाख आयफोन भारतात तयार करण्यात आले होते. मार्चं २०२५ अखेर सरलेल्या दुस-या तिमाहीत आपापले महसुलात ५ टक्के वाढ नोंदवली असून ती ९५.३५ अब्ज डॉलरवर गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ९०.३५ अब्ज डॉलर होती. मुख्यता मॅक आणि आयपॅडची मागणी वाढल्याने ही वाढ साध्य झाली आहे. Apple विक्री अमेरिकेत सुमारे ८ टक्क्यांनी वाढून ४०.०३ अब्ज डॉलर, युरोपमध्ये १.२ टक्क्यांनी २४.४५ अब्ज डॉलर आणि जपानमध्ये १६.५२ अब्ज डॉलर राहिली.


Leave a Reply