लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा 1500 हजाराचा हफ्ता बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालं आहे. हा 10वा हफ्ता असून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 15 हजार रुपये या योजनेच्या माध्यमाने मिळाले आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया कालपासून सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. ज्या लाडक्या बहिणींची बँक खाती आधार लिंक असतील त्यांना दोन ते तीन दिवसात पैसे मिळून जातील असं त्यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभागानं काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्यांच्या कुुटुंबातील व्यक्तीच्या नावे चार चाकी गाडी असू नये, यासह इतर निकष लावण्यात आले होते.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारच्या विधानसभा निवडणुकीतील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. यापूर्वी 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी आदिवासी विकास विभागातील 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागातील 410 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला, यावरुन विरोधी पक्षांना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयानुसार पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या महिलांना एका वर्षात 12000 रुपये मिळतात. सरकारचं डीबीटीद्वारे कमाल 18000 रुपये देण्याचं धोरण आहे. त्यामुळे राहिलेले 6000 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. म्हणजेच दरमहा 500 रुपये महिलांना दरमहा मिळणार आहेत. या महिला लाभार्थ्यांची संख्या 774148 एवढी आहे. या महिलांना दरमहा केवळ 500 रुपये मिळणार आहेत.
Leave a Reply