मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईत मे महिन्यात फक्त 23 टक्के जलसाठा उरला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. ज्यात भातसा आणि अप्पर वैतरणातून हा साठा घेण्यात येणार आहे.

त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा २३ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी कपात केली जाऊ शकते. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेने याबाबत काही निर्णय घेतला नाही. पण येत्या १५ मेपर्यंत सर्व धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

तानसा, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या ५ धरणांमधून तर तुळशी आणि विहार या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबई शहराला या सातही जलाशयांमधून दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सातही जलाशयामधून वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी १४, ४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पण यावर्षी या सातही जलाशयांमध्ये ४,११,३५५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *