भारत-तणावदरम्यान आणि ऑपरेशन सिंधूरनंतर निमलष्करी दलातील रजेवर असलेल्या जवानांना ड्युटीवर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी हा आदेश काढला आहे. अमित शाह हे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सातत्याने संपर्कात असून सीमेवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आपत्कालीन स्थितत नागरिकांना आसरा घेता यावा, यासाठी सीमाभागात बंकर यापूर्वीच बांधण्यात आले होते.त्याचा आता तेथील नागरिक उपयोग करत आहेत.त्याचसोबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेचाही आढावा घेतला.
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायू दलानं (Air Force) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सैन्यानं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं आहे.
Leave a Reply